Agriculture News Front देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

“त्या”शेतकऱ्यांना डॉ शशिकांत खेडेकरांच्या प्रयत्नाने मिळणार लाभ.

Spread the love

देऊळगाव मही|समर्थ भारत मराठी :

अतिवृष्टी च्या मदतीपासून वंचित राहिलेल्या त्या दीडशे शेतकऱ्यांना आता डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नाने लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील वर्षी झालेल्या संततधार पावसाच्या नुकसानीमुळे देऊळगाव मही येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. अनेक शेतकऱ्यांना मदत मिळाली मात्र देऊळगाव मही येथील दीडशे शेतकरी नुकसान भरपाई च्या मदतीपासून वंचित होते.

शेतकऱ्यांनी हि बाब वेळोवेळी शासन दरबारी मांडली, मात्र प्रशासनावर याचा काहीच परिणाम झाला नाही. या शेतकऱ्यांनी सिंदखेडराजा मतदार संघाचे माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. डॉ.खेडेकरांनी शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयावर आपला मोर्चा वळविला यावेळी नायब तहसीलदार आसमा मुजावर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. डॉ.खेडेकरांनी शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत भ्रमणध्वनीद्वारे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना कळविले असता त्यांनी तात्काळ मदतीचे आश्वासन दिले.दोनच दिवसात त्याचा पाठपुरावा करून वंचित राहिलेल्या त्या दीडशे शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

यावेळी शिवसेनेचे नेते शिवहरी शिंगणे, संदीप राऊत, तुळशीराम पंडित ,गजानन जोशी , भगवान जोशी ,संतोष शिंगणे, शिवाजी शिंगणे ,अनिल शिंगणे,लक्ष्मण चोपडे ,मुरलीधर कुठे, अर्जुन कुठे ,संतोष संपत शिंगणे, यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!