Front Maharashtra बुलढाणा जिल्हा शेगांव

शेगांव नगर पालिकेच्या अन्यायकारक मालमत्ता कर वाढीला स्थगिती. आ.डॉ.संजय कुटे यांचे प्रयत्न.

Spread the love

शेगांव|समर्थ भारत मराठी :

शेगांव नगर परिषदेने सुरू केलेल्या अवाजवी करवाढिला स्थानिक नागरिकांचा विरोध होता याबाबत मतदारसंघाचे आ. डॉ. संजय कुटे यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाले होत्या त्या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना तात्काळ स्थगिती देण्याचे आदेश दिले होते.

सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आ.डॉ.संजय कुटे यांनी करवाढीचा प्रश्न प्रामुख्याने उचलून धरला. शेगाव नगरपालिकेची कर आकारणी पुन्हा करण्यासाठी न्यायालयाने आदेश दिला होता.त्या विरोधात स्थानिक नगरपालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्याने कर वाढीचे हे प्रकरण सध्या स्थगित आहे.करवाढिच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी अपील समिती शेगाव नगर परिषदेमध्ये नाही.तरीसुद्धा नगरपालिका प्रशासन कर आकारणीवर कोणताही निर्णय न घेता आवश्यकतेपेक्षा जास्त पटीने कर आकारणी करीत असल्याच्या तक्रारी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ. संजय कुटे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. शेगाव नगरपरिषद जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात येत असल्याने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पुढाकार घेतला.व ह्या अन्यायकारक करवाढीला स्थगिती देण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. डॉ.कुटे यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ स्थगिती देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश अप्पर सचिवांना दिले होते त्यानुसार करवाढीला स्थगिती देण्यात आली आहे.गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेगाव नगरपरिषद करवाढीला स्थगिती मिळविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे  शेगाव शहरात आ.डॉ.कुटे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत…

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!