Front Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगांव जा. चे मुख्याधिकारी आकाश डोईफोडे व विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

Spread the love

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

केलेल्या कामाचे देयक अदा केल्याचा मोबदला म्हणून जळगाव जामोद नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक बारा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. या दोघांना आज सकाळी एसीबीच्या पथकाने पकडले. या धाडसी कार्यवाहीमुळे नगर पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून संबंधित ठेकेदाराकडून विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके यांनी स्वतःसाठी सहा हजार रूपये व मुख्याधिकारी आकाश डोईफोडे यांच्यासाठी सहा हजार रुपये अशी एकूण बारा हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे तक्रारदाराने दिली होती.आज दि.१३ रोजी मुख्याधिकारी डोईफोडे यांची पडताळणी केली असता त्यांनी लाच रक्कम स्विकारण्यास संमती देवून लाच रक्कम विद्युत पर्यवेक्षक शेळके यांचेकडे देण्यास सांगीतले. सापळा कार्यवाही दरम्यान विद्युत पर्यवेक्षक शेळके यांना बारा हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले.

सदर धाडसी कारवाई पोलिस उपअधिक्षक श्रीमती शितल घोगरे,व पोलीस निरीक्षक सचिन इंगळे,महेश भोसले ,सापळा पथक पोलीस उपनिरीक्षक शाम भांगे, पो.हे.कॉ. विलास साखरे, प्रवीण बैरागी, रवी दळवी, पो.नाईक जगदीश पवार,विनोद लोखंडे पो.कॉ. शैलेश सोनवणे,स्वाती वाणी,नितीन शेटे,अरशद शेख आणि इतर कर्मचारी बुलढाणा यांच्या पथकाने केली.सदर घटनेने  पालिका प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!