Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

धानोरा(महासिध्द) येथे अखंड दत्तनाम सप्ताह व १२८ महापूजा संपन्न.

Spread the love

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

जळगांव जामोद तालुक्यातील तीर्थक्षेत्र धानोरा (महासिद्ध) येथे दरवर्षी प्रमाणे अखंड दत्तनाम सप्ताह व १२८ महापूजेची महाप्रसादाने सांगता करण्यात आली.

तपस्वी तपोनिधी परमपूज्य दयानंद महाराज यांचे पुण्यतिथी निमित्ताने स्व.रामदासजी निर्मळ यांचे प्रेरणेतून धानोरा (महासिद्ध)येथील दत्त मंदिरामध्ये दि.६डिसेंबर पासून अखंड दत्तनाम सप्ताह मध्ये दररोज आरती,ज्ञानप्रकाश बालक्रीडा ग्रंथाचे पारायण,सोडसपूजा,निजात्मबोध ग्रंथाचे वाचन व विश्लेषण,दररोज सकाळ संध्याकाळ अन्नदान,आणि १२ डिसेंबर  रोजी रात्री ९ वाजता १२८ महापूजा दत्तनामा च्या जय घोषात संपन्न झाली.१३डिसेंबर ला सकाळी टाळ मृदंग चे निनादात गावामधून पालखी मिरवणूक काढण्यात आली व नंतर हजारो भक्तांनी महाप्रसाद लाभ घेतला .

सदर सप्ताह यशस्वी करणे करिता गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!