Front political party जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

भाजपच्या वतीने प्रियांक खर्गे यांच्या पुतळ्याला ‘जोडे मारो’ आंदोलन.

Spread the love

जळगाव जामोद|समर्थ भारत मराठी :

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल काँग्रेसचे कर्नाटकचे कॅबिनेटमंत्री प्रियांक खर्गे यांचा भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा यांच्या वतीने प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन व जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री प्रियांक खर्गे यांनी काल स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले व त्यांनी प्रियांक खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन केले व आपला रोष व्यक्त केला.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परिक्षीत ठाकरे, प्रदेश सदस्य राजेंद्र गांधी,रामदास बोंबटकार, शाकीर खान, अंबादास निंबाळकर,चंद्रकांत शिंदे,बाळू पाटील,गोपाल वनारे, राम इंगळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!