Agriculture News Front Maharashtra बुलढाणा बुलढाणा जिल्हा

तुपकरांची सरकार सोबतची बैठक यशस्वी;बहुतांश मागण्या मान्य.

Spread the love

बुलढाणा|समर्थ भारत मराठी :

सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी रविकांत तुपकरांनी गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यांनी अन्नत्याग चालू ठेवत काल मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने आगेकूच केली व हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले,अन् सरकार चर्चेला तयार झाले. राज्य शासनाकडून उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे बैठक पार पडली. या दोन तासाच्या बैठकीत अतिशय सकारात्मक  चर्चा झाली व सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या बाजूने बहुतांश मागण्या मान्य झाल्या.

जर सरकारने पंधरा दिवसांत आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर नागपूर अधिवेशनावर हजारो सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी चाल करून जातील व ते सरकारला महागात पडेल, असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला.

बैठकीला सहकार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील, आ.डॉ. राजेंद्र शिंगणे, आ.डॉ.संजय कुटे यांच्यासह सचिव तुकाराम मुंढे, अनुप कुमार, श्रीकर परदेशी व विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात ॲड.शर्वरी तुपकर, डॉ.ज्ञानेश्वर टाले, लक्ष्मी झगरे, विनायक सरनाईक, अमोल राऊत, श्याम अवथळे, अमित आढावू, नारायण लोखंडे, विशाल गोटे, विठ्ठलराजे पवार, राजेंद्र मोरे, भारत वाघमारे, दत्तात्रय जेऊघाले, नितीन राजपूत, जितू अडेलकर, समाधान गिरी यांचा समावेश होता.

error: Content is protected !!