

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :
डॉ . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित स्वा.वीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि औदयोगिक प्रशिक्षण कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत काजेगाव येथील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे मोबाईल अँप कामधेनू गौशाला,अमूल पशु आहार इ.अँप बद्दल माहिती दिली.या अँप चा उपोयोग पशुपालनामध्ये उत्पन्न वाढविण्याकरीता कसा करता येईल? हे अँप मोबईल मध्ये कसे हाताळायचे? या बद्दल माहिती दिली.
सोबतच ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि औदयोगिक प्रशिक्षण कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत काजेगाव येथील शेतकऱ्यांना पीक उत्पादनात सूक्ष्म पोषक घटकांची भूमिका काय असते? त्यांचे महत्व,त्यांचे कार्य आणि त्यांची कमतरता भासल्यास काय? उपाय योजना करायला पाहिजे याबद्दलही मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम प्राचार्य प्रा . योगेश गवई,कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे,कार्यक्रम समन्वयक प्रा.विद्या कपले आणि विषयतज्ञ प्रा . नम्रता खिरोडकर,विषयतज्ञ प्रा .समाधान काळे यांच्या मार्गदर्शनात आकाश काळपांडे , प्रशांत कट्टा ,ऋतिक खंडारे ,श्रेयश खांडवाये ,अभिजीत खुमकर ,हरिष कोकाटे यांनी आयोजित केला.
Add Comment