Agriculture News जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

ई-केवायसी लिंक त्वरित सुरू करा.. 

Spread the love

वंचित बहुजन आघाडीची मागणी.

जळगांव जामोद |समर्थ भारत मराठी :

२२जुलै रोजी झालेल्या महापूरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, पिकांचे नुकसान झाले. नुकसानभरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करावी लागत आहे मात्र ही लिंक बंद असल्याने ती त्वरित सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. 

तब्बल पाच महिन्या नंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे शासनाने जाहीर केले. ११ नोव्हेंबर रोजी नुकसानग्रस्ताची यादी जाहीर करण्यात आली. ई केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई ची मदत जमा होणार आहे. परंतु एकच दिवस ई केवायसी लिंक शासनाकडून सुरू ठेवण्यात आली होती. त्या नंतर  जवळपास १८ दिवस झाले ई केवायसी लिंक ची साईट बंद आहे.

ज्या ई-केवायसी लिंकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होते ती साईट लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अन्यथा दि. ०५ डिसेंबर ला लोकशाही मार्गाने वंचित बहुजन आघाडी जळगांव (जा) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदन देतांना शहर अध्यक्ष आजम कुरेशी, माजी तालुका अध्यक्ष रतन नाईक, तालुका उपाध्यक्ष सुनिल बोदडे,  प्रकाश भिसे, संचालक प्रशांत अवसरमोल, संतोष पवार, मनोज अंदुरकार, कैलास भगत,स्वप्निल भोरे, अमोल तायडे, महादेव खरात,सुदाम गवई, यांसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!