बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.
जळगांव जामोद,दि.२८(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालि अंतर्गत सामान्य, गरजु,गरीब नागरीकांना वितरीत होणारा तांदुळ तसेच इतर धान्याची काळ्या बाजारात होत असलेली चोरटी वाहतूक आणि विक्री थांबवून कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.पोनि.सुनिल अंबुलकर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक करुन त्यांना वरिष्ठांचे निर्देशांप्रमाणे कार्यवाही करणेबाबत सुचित केले होते.त्यानुसार पो.स्टे. जळगांव जामोद हद्दीत स्थागुशाचे पथकाने दि.२८ रोजी अत्यावश्यक वस्तु अधिनियम अंतर्गत कारवाई करत सुमारे ५८४ क्विंटल तांदूळ हस्तगत केला आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, ट्रकमध्ये शासनाचे सार्वनिक वितरण प्रणालिचा तांदुळ जात आहे. या माहितीवरुन स्था.गु.शा.च्या पथकाने जळगांव जामोद ते नांदुरा रोड वरील गोडेगांव फाट्यावर सापळा रचून ट्रकला चालकासह पकडून कारवाई केली. या कारवाईमध्ये वाहन चालक याचे ताब्यातून ट्रक क्रं. GJ 03 CU 2282 मध्ये २४० क्विटल कि.६,७९,८००/- रु.चा सार्वजनिक वितरण प्रणालीचा तांदुळ हस्तगत करण्यात आला.
पथकाने ट्रक चालकास तांदुळ कोठुन आणला याबाबत विचारणा केली असता कुरणगाड बु. येथील गोडावुन मधुन भरुन आणल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने गोडावुनचे ठिकाणी जावुन पाहिले असता गोडावुन मध्ये ३४४ क्विटल तांदुळ कि.१०,३२,०००/- रु चा हस्तगत करण्यात आला. तांदुळ मोजण्याकरीता वापरण्यात येणारे वजन काटे, पोते शिलाई मशीन व इतर साहित्य,ट्रक मधील व गोडावून मधील एकुण ५८४ क्विटल तांदुळ कि.१७,७२०००/- रु असा एकूण ४२,९२,२००/-रु.चा मुद्देमाल हस्तगत केला.या कारवाई मध्ये भटटी कादर कासम, वय ५५ वर्षे रा. अरव शेरी मालीया जि. राजकोट, गुजरात; वैभव सुनिल आटोळे, वय २५ वर्ष, रा. कुरणगाड; अंकुश केशन आटोळे, वय २२ वर्ष रा. कुरणगाड यांना पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई निलेश तांबे;पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या आदेशान्वये तर अमोल गायकवाड;अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा,श्रेणीक लोढा;अपर पोलीस अधीक्षक, खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.सुनिल अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांचे नेतृत्वात पोउपनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. राजेंद्र टेकाळे. पोहेकॉ. जगदेव टेकाळे, पोकॉ. अमोल शेजोळ, मंगेश सनगाळे, निलेश राजपुत, चापोहेकॉ. विकास देशमुख नेमणूक-स्था.गु.शा. बुलढाणा यांचे पथकाने केली.पुढील तपास कारवाई पो.स्टे. जळगांव जामोद करीत आहेत.
Add Comment