जळगांव जामोद,दि.२९(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
तालुक्यातील शेतकर्यांचा पिक विमा व संपूर्ण कर्ज माफी सह इतर शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी शिवसेना(उ.ब.ठा) तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला.
संपूर्ण कर्जमाफी आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना न मिळालेली भरपाई यामुळे शेतकरी भयंकर आर्थिक संकटात सापडल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे नोंदवली आहे. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुढील काळात उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, दैनंदिन वस्तू महागल्या आहेत. बी-बियाणे, खतं आणि पिक लागवडीच्या खर्चात मोठी वाढ झाली असली तरी शेतमालाला बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या खर्चाचा ताळमेळ साधला जात नाही आणि कर्जाचा बोजा वाढत आहे.सरकारने निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही. त्यामुळे शेतकरी मानसिक तणावाखाली असून आत्महत्यांच्या घटना वाढण्याची भीती आहे.
२०२३-२४ या वर्षाचा रब्बीचा पीक विमा तात्काळ देण्यात यावा,फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे,पूर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, २०२४-२५ चा पीक विमा तात्काळ देण्यात यावा,२०२४ मध्ये ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी.
उपरोक्त मागण्या मान्य न झाल्यास शिवसेनेच्या पाठिंब्याने होणारे आंदोलन उग्र व संघर्षमय वळण घेईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सह संपर्कप्रमुख दत्तात्रय पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मुश्ताक भाईजान, युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, विधानसभा संघटक भिमराव पाटील, शहरप्रमुख रमेश ताडे,युवा सेना उप जिल्हाप्रमुख विशाल पाटील, उपशहरप्रमुख शेख चांद, संतोष डब्बे, सुभाष माने, गजानन मांडेकर, पुंडलिक पाटील, गुणेंद्र खोद्रे, विशाल टाकोटे, कैलाश राजपूत, सुनील पाटील, बाळू पाटील, ज्ञानेश्वर वानखडे, शेरसिंग सोळंके, दिलीप पाटील, किसन मीरगे,प्रमोद रोजतकर ,राजू मोरखडे,रमेश हागे, रामेश्वर केदार, वसंत केदार, रवी बाणाइत,सुनील गवई, कैलाश बघे ,रामचंद्र लाहुडकार ,गुणा वायडे ,गजानन टेकाडे, राजू गावडे,संतोष पाटील,मंगेश कतोरे,संकेत राहटे, सुधीर पारवे आदी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add Comment