जळगांव जामोद,दि.२७(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
तालुक्यातील उमापूर येथे दि.२५ रोजी शिवसेना ग्राम शाखा गठीत करण्यात आली.ग्राम शाखेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी केले.
शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न पीक विमा,संपूर्ण कर्जमाफी, २०२३-२४ मधील ढगफुटी मध्ये खरडून गेलेली शेतीचा लाभ तसेच इतर विविध मागण्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी जळगाव जामोद येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चा संदर्भात माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.शासनाच्या अपुऱ्या धोरणामुळे शेतकरी हतबल व अडचणीत सापडला आहे या अन्यायाविरुद्ध शिवसेना सातत्याने लढा देत राहील त्याकरिता सर्व शेतकऱ्यांनी जात, पात, धर्म, पक्ष, भेद विसरून या भव्य आक्रोश मोर्चा सामील व्हावे असे आवाहन तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांनी केले.
कार्यक्रमाला सहसंपर्कप्रमुख दत्तात्रय पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, विधानसभा संघटक भिमराव पाटील,शहर प्रमुख रमेश ताडे,उपशहर प्रमुख संतोष डबे,तालुका प्रसिद्धीप्रमुख सुधीर पारवे,माजी युवा सेना तालुकाप्रमुख विशाल ताकोते, प्रमोद रोजत्कार, राजू गावंडे, संजय निंबाळकर तसेच नियुक्त झालेले उमापूर शाखाप्रमुख अर्जुन पानेकर,उपशाखाप्रमुख प्रकाश बिबाकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.













