जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगावतील कोल्ड्रिंक सेंटरला भीषण आग.

Spread the love

लाखो रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी.

जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी प्रतिनिधी :

स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात असलेल्या राधे कोल्ड्रिंक्सला दि.१२ रोजी पहाटे पाचच्या दरम्यान लागलेल्या आगीत कोल्ड्रिंक्स दुकानांमधील साहित्य व इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

सकाळी पाचच्या सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या राधे कोल्ड्रिंक्स दुकानात भीषण आग लागली. जवळच पोलीस स्टेशन असल्याने पोलिसांना आगीचे लोट दिसले.लगेचच जळगाव जामोद येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.आगीचे रौद्ररूप पाहून शेगाव येथील अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले.सुमारे दोन-अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.दुकानातील सर्व विक्रीच्या वस्तू, फ्रिज,सिलेंडर व इतर साहित्य जळून खाक झाले.

error: Content is protected !!