Agriculture News Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा शेगांव संग्रामपूर

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नागपुरात ११ एप्रिलला कार्यशाळा.

Spread the love

मतदार संघातील शेतकरी बंधूनी लाभ घ्यावा – आ. डॉ संजय कुटे 

जळगांव जामोद,दि.८(प्रतिनिधी):

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनात ॲग्रोव्हिजन फाउंडेशन आणि महाऑरेंजच्या वतीने येत्या ११ एप्रिलला विदर्भस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. वेस्ट हायकोर्ट मार्गावरील भोले पेट्रोल पंप जवळ वनामती सभागृहात सकाळी १०.०० वाजता ही कार्यशाळा प्रारंभ होणार असून राष्ट्रीय महामार्ग व सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी हे उदघाटक व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील. यावेळी आ डॉ कुटे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.

एका एकरात किमान ४० टन संत्र्याचे उत्पादन व्हावे, विदर्भात उत्तम नर्सरी निर्माण करून शेतकऱ्यांना रोगमुक्त कलमा पुरवठा करता यावे, संत्रा निर्यात वाढावी हे या कार्यशाळा आयोजनाचे उद्देश्य आहे. जळगाव जामोद मतदारसंघातील शेतकरी सुखीसंपन्न व्हावा, ग्रामीण भागात आर्थिक क्रांती व्हावी यासाठी आ  डॉ कुटे हे  सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यासाठी मतदार संघातील संत्रा उत्पादक शेतकरी बंधू नी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असा आवाहन ही त्यांनी केले.

पिक वाढ व्यवस्थापन, संत्रा घन लागवड पद्धत नियोजन, व्यवस्थापन, हवामान, माती, व एकात्मिक कीड, पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक काढणी पश्चात तंत्रज्ञान-ग्रेडिंग, सॉर्टंग, पॅकेजिंगआणि विपणन व्यवस्थापनाची माहिती या संत्रा प्रशिक्षण कार्यशाळेत तज्ञांकडून देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत विदर्भातील संत्रा उत्पादकांनी सहभागी व्हावे, गुगल लिंकवर क्लिक करून अर्ज भरून नोंद करावी, असे आवाहन डॉ. सी. डी. मायी, रवींद्र बोरटकर, सुधीर दिवे व महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे, मनोज जवंजाळ, आदींनी केले आहे.

error: Content is protected !!