Education जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

एन एम एम एस परीक्षेत दी. न्यू इरा हायस्कूलचे ४० विद्यार्थी उत्तीर्ण व १३ शिष्यवृत्तीसाठी पात्र.                            

Spread the love

जळगाव जामोद,दि.८|समर्थ भारत मराठी प्रतिनिधी : 

राष्ट्रीय दुर्बल घटकांसाठी असलेल्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत शहरातील दि न्यू इरा हायस्कूल मधून  २०५ विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १३ विद्यार्थी शिष्यवृतीसाठी पात्र ठरले आहेत. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य अविनाश कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेत दि.७ एप्रिल रोजी शालेय परिसरात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.                             

याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील दि न्यू इरा हायस्कूल मधील  सुपेश कैलास राजुरकर,योगीराज सुदर्शन पारस्कार,श्वेता अतुल अंबुलके, रुत्वीक अभिजीत डोंगरे, श्रीकांत अतुल भिसे,श्रावणी राजेश मिसाळ,चेतन शंकर उगले,भक्ती श्रीराम  निमकर्डे, रेणुका श्रीकृष्ण माटे,मयुर हरीश मसरे,जान्वी नारायण खुपसे, मैथीली संजय दंडे, व राजेंद्र सुभाष शिंदे असे एकूण १३ विद्यार्थी एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.  या सर्व पात्र विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने प्राचार्य अविनाश कुळकर्णी उपप्राचार्य शेख सलीम ,पर्यवेक्षक ओंकारराव तायडे यांनी शाळेत आयोजित कार्यक्रमात सत्कार केला व त्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक अभिजीत जोशी व शिक्षक शारीक बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.

error: Content is protected !!