जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगांव जामोद मतदारसंघ राज्याच्या केंद्रस्थानी नेणार : आ डॉ.संजय कुटे

Spread the love

जळगाव जामोद,दि१.(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

प्रत्येक नागरिकाचे काम करणे वेगवेगळ्या विभागांच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचे काम आहे त्यासाठी शासनाने लोककल्याणकारी व्यवस्था उभी केली आहे. तालुक्यातील शेवटच्या घटकांचे गाऱ्हाणे ऐकणे मी माझे कर्तव्य समजतो. शिक्षण, सिंचन, इंन्फ्रास्टक्चर हे विकासाचे व्हिजन असून  २०३४ पर्यंत पूर्ण करून जळगाव जामोद मतदारसंघ राज्याच्या केंद्रस्थानी नेणार  असल्याचे प्रतिपादन आ.डॉ.संजय कुटे यांनी पंचायत समितीच्या आवारात आमसभा व सरपंच मेळाव्याप्रसंगी केले.

यावेळी अध्यक्षस्थानी आ. डॉ संजय कुटे,तहसीलदार पवन पाटील,गट विकास अधिकारी संदीप मोरे, तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ उज्वला पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती. या आमसभेत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम, जल जीवन मिशन, पाणी पुरवठा, भुमी अभिलेख, महावितरण, महसुल, पंचायत समिती आदी विभागातील समस्या व तक्रारी जाहीरपणे व्यक्त केल्या नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊन नागरिकांना आश्वस्थ करण्यात आले. तर आवश्यक त्या ठिकाणी स्थळ पाहणी करुन अथवा कागदपत्रे पाहून अल्पावधीतच निर्णय घेण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना आ संजय कुटे यांनी दिल्या.

यावेळी आ डॉ संजय कुटे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी संदीप मोरे व शासन स्तरावर तसेच शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी, सरपंच,शिक्षकांचा यावेळी आ. डॉ.संजय कुटे व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

सूत्रसंचालन श्रीकृष्ण भटकर आणि शुभांगी सोळंके यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी सावरकर यांनी केले.

या आमसभेला तालुक्यातील सर्व सरपंच, क्षेत्रीय स्तरावरील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, केंद्रप्रमुख, शिक्षक माजी जि. प. तथा पं. स. सदस्य यांच्यासह कर्मचारी,पत्रकार  यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत:-

आमसभेत एक प्रश्नाचे उत्तर देतांना तहसीलदार पवन पाटील यांनी  प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला यापुढे विनामूल्य पाच ब्रास रेती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

जळगांव जामोद शहराची हद्दवाढ होणारच:-

जळगांव जामोद शहराची हद्दवाढ अंतिम टप्प्यात असल्याचे आ.डॉ.संजय कुटे यांनी सांगत आसलगाव ग्रामपंचायत नाहरकत देण्यास टाळाटाळ करत असल्याचेही त्यांनी सांगितले. १४० गाव पाणीपुरवठा योजनाही नाहरकती शिवाय मंजुर झाली. हद्दवाढीसाठी नाहरकत मिळाली नाही तरी कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होणारच असल्याचे त्यांनी सांगितले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!