india kolhapur Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

विश्वविक्रमी रांगोळी रेखाटण्यात जामोदच्या विशाखाचा सहभाग.

Spread the love

जळगांव जामोद,दि२६.(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी) :

तालुक्यातील जामोद येथील रहिवासी कु. विशाखा विनोद वानखडे हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वविक्रमी रांगोळी रेखाटण्यात सहभाग नोंदविला असून नुकतेच त्याबाबत तीला प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

विशाखा ही सायबर कॉलेज कोल्हापूर येथे एम एस डब्ल्यू चे शिक्षण घेत आहे. तिने जागतिक स्तरावरील नोंद झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी रेखाटण्याकरिता सहभाग नोंदवला होता. त्याकरिता तिला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. १२ जानेवारीस छत्रपती शिवाजी महाराजांची ४.५ लाख चौरस फुटांची रांगोळी साकारली होती. ती रांगोळी स्वराज्य युवा प्रतिष्ठान,शिव गौरव समिती व ताराराणी ब्रिगेड महिला मंचतर्फे  छत्रपती शिवाजी महाराज यांची साडेचार लाख स्क्वेअर फुटांची रांगोळी साकारण्यात आली होती. नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील सैनिक स्कूल येथे हा उपक्रम राबविण्यात आला होता.तेथे काढलेली जगातील सर्वात मोठी रांगोळी ठरली आहे.

‘जिजाऊ जयंतीचे औचित्त्य साधून रांगोळी साकारण्यात आली होती.दहा जानेवारीला रांगोळी काढण्यास सुरुवात करण्यात आली होती.यापूर्वी देखील ३ लाख ४५ हजार स्क्वेअर फुटांची रांगोळी मिर्झापूर येथे काढण्यात आली होती.तर नवे पारगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ही रांगोळी साडेचार लाख स्क्वेअर फुटांची रांगोळी साकारण्यात आली आहे.

या विश्व विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड,वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून त्यात सुमारे १२५ महिला व शालेय विद्यार्थिनी च्या सहभागाने  ही शिवरायांची उभी प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारण्यात आली असून, त्यासाठी ३६ टन रांगोळी लागली.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!