india Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

संजय गाडेकर यांना राष्ट्रीय भारतभुषण पुरस्कार जाहीर.

Spread the love

जळगाव जामोद,दि.२५(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

ग्लोबल फाउंडेशन नवी दिल्ली च्या वतीने डॅा बी.आर. आंबेडकर भारतभुषण सन्मान राष्ट्रीय पुरस्कार २०२५ स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे अधीक्षक संजय गाडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

विविध राज्याच्या विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देण्यात येतात.यावर्षी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील अधीक्षक संजय सीताराम गाडेकर यांना सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी डॉ. बी. आर. आंबेडकर भारतभुषण सन्मान राष्ट्रीय पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात येणार आहे.

नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात दि.९ मार्च रोजी आयोजित करण्यात येत असलेल्या या सम्मान सोहळ्यात राष्ट्रीय महीला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया राहाटकर,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले,केंद्रीय राज्यमंत्री ना.मुरलीधर मोहोळ यांचे उपस्थितीत सन्मानपत्र, स्मृति चिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील अधीक्षक संजय  गाडेकर यांच्या शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक योगदानासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा राष्टीय पुरस्कार महाविद्यालयाच्या नावाच्या लौकिकात निश्चितच भर घालणारा आहे. जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, सचिव अनुप पुराणिक,प्राचार्य डॅा.गिरीश मायी सर्व प्राध्यापक तथा  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!