Maharashtra खामगांव जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा संग्रामपूर

प्रविण पुंडकर यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान.

Spread the love

नागपूर येथे अभियंतादिनी झाला गौरव.

जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :

सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत अद्यावत तंत्रज्ञान वापरून दर्जेदार कामे करणारे जळगाव जामोद सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता प्रवीण पुंडकर यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार १५ सप्टेंबर रोजी नागपूर महापालिकेच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या एका विशेष समारंभात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र दत्तात्रेय चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रविण पुंडकर यांनी पत्नी सौ. आरती व कन्या कु. जिजा यांच्यासमवेत हा पुरस्कार स्विकारला.

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनी अभियंता दिवशी पार पडलेल्या या कार्यक्रमाला बांधकाम विभागाच्या मुख्य सचिव मनीषा पाटणकर, सचिव साळुंखे, सचिव दशपुते, मुख्य अभियंता गिरीश जोशी यांच्यासह शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती. खामगावचे कार्यकारी अभियंता सुनील थोटांगे, उपविभागीय अभियंता जितेंद्र काळे, संतोष तायडे तसेच जळगाव जामोद उपविभागातील अभियंता निलेश भेलके, हर्षद कुळसंगे, सागर लाड, प्रतीक धुंदळे, मनोज खंडारे, कडूसिंग जाधव यांच्यासह सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसुध्दा प्रविण पुंडकर यांच्या गौरव सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित होते. दरम्यान शासनाचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभियंता दिनाच्या पूर्वसंध्येला खामगाव येथे कार्यकारी अभियंता सुनील थोटांगे, उपविभागीय अभियंता जितेंद्र काळे, सचिन तायडे यांनी पुरस्कार प्राप्त उपविभागीय अभियंता प्रवीण फुंडकर यांचा सत्कार केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव अंतर्गत सर्व अभियंते व कर्मचाºयांची उपस्थिती होती. उपस्थित सर्वांनी पुंडकर यांनी भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याआधी सन २०१९ मध्ये जितेंद्र काळे तर गतवर्षी सुनिल थोटांगे यांनाही उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

error: Content is protected !!