जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
ऑनलाइन पद्धतीने जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालात स्थानिक दी.न्यू. इरा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ८७.८० लागला आहे.
दि .न्यू. इरा विज्ञान शाखेतून १२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ८ विद्यार्थी प्राविण्यश्रेणी,३५ प्रथम श्रेणी,७६ द्वितीय श्रेणीत तर ९ विद्यार्थी पास विविध उत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर कला शाखेमध्ये एकूण ८२ विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी ५ प्राविण्यश्रेणीमध्ये,१७ प्रथम श्रेणीमध्ये,३४ द्वितीय श्रेणीमध्ये,१६ पास श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून कला शाखेचा निकाल ८७.८० टक्के आहे.
विज्ञान शाखेमधून प्रतीक भास्कर हांडे ८८.३३ टक्के गुण घेऊन प्रथम तर सुरज अरविंद ढगे ८१.५० टक्के गुण घेऊन द्वितीय तर प्रांजली वसंता गाडगे ८०.१७ टक्के गुण घेऊन तृतीय आले आहेत.
कला शाखेतून पल्लवी प्रकाश चोपडे व समीक्षा सखाराम हागे ह्या दोघी ८३% गुण घेऊन प्रथम आल्या आहेत.मयुरी डिगांबर मिसाळ ७९.१७% घेऊन द्वितीय तर शिवानी योगेश मिश्रा ७८.८३ टक्के तृतीय आली आहे.विज्ञान शाखेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, सचिव अनुप पुराणीक व संचालक मंडळाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल प्राचार्य अविनाश कुलकर्णी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.
Add Comment