Maharashtra political party Politics जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा शेगांव संग्रामपूर

जळगांव जामोद मतदारसंघात शेवटच्या क्षणी कोट्यवधींच्या विकास निधीचा बूस्टर!

Spread the love

१२५ कोटींचा विकास निधी : आ.डॉ.संजय कुटे यांचे प्रयत्न.

जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :

जळगाव मतदार संघाचे आ.डॉ.संजय कुटे यांच्या विशेष प्रयत्नाने आचारसंहिता लागण्या अगोदर एक दिवस आधी शेवटच्या क्षणी मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर करून १२५ कोटींचा विकास निधीचा बूस्टर मतदारसंघाला मिळाला आहे.

नुकत्याच मंजूर झालेल्या विकास निधीमध्ये आ.कुटे यांनी शहरी तसेच ग्रामीण भागाचा विकास साधत समतोल राखला आहे.केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अंतर्गत जळगाव जामोद नगरपरिषदेच्या  २२ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पास मान्यता मिळाली आहे.तसेच नगरोत्थान महाभियान अंतर्गत संग्रामपूर शहरातील १२ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पास मंजुरात मिळाली असल्याने दोन्ही शहरातील नागरिकांना यापुढे मुबलक पाणी मिळणार आहे.मतदारसंघातील शेगाव,संग्रामपूर व जळगाव जामोद नागरी बहुल क्षेत्राकरिता विविध विकास कामे करण्यासाठी तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.जळगाव शहरातील पद्मावती नदीच्या विकासाकरिता ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तर श्री संत तुकाराम महाराज चौक,डॉ. बाबासाहेबआंबेडकर चौक विकासा करिता एक कोटी रुपये,जळगाव नगरपरिषद अंतर्गत शाळा खोल्या बांधकाम, प्रभाग निहाय रस्ते व नाल्या बांधकाम,खुल्या जागा विकसित करणे व वायली वेस चौकाचे सौंदर्यीकरण करणे याकरिता सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

गौतम नगर येथील खुल्या जागेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन बांधकामाकरिता एक कोटी रुपये,राजू वेल्डिंग हिंदू स्मशानभूमी करता ५० लक्ष तर नगर परिषदेच्या विविध इमारतीच्या नूतनीकरण करता ५० लक्ष याप्रमाणे जळगाव जामोद नगरपालिकेकरिता १७ कोटी रुपयांचा विकास निधी आमदार कुटे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे.

संग्रामपूर नगर पंचायतीकरता व्यापारी गाळे बांधकाम करणे,लेंडी नदीवरील छोटा पूल बांधणे,जगदंबा संस्थांना करिता सभागृह बांधकाम करणे तसेच तामगाव पोलीस स्टेशन कडे जाणारा रस्त्याचे रुंदीकरण व सौंदर्यीकरण करणे याकरिता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.

शेगाव नगरपरिषद अंतर्गत डी.पी रोड टप्पा क्रमांक एक दोन तीन व चार करिता रस्ते विकसित करणे, शहरातील नवीन शाळा खोल्या बांधकाम करणे, शहरातील खुल्या जागा विकसित करणे, मराठा समाज मंगल कार्यालय बांधकाम करणे,संत सेना महाराज सभागृहाचे बांधकाम करणे,इंदिरानगर व एस.टी. डीपो जवळील स्मशानभूमी विकसित करणे,वाचनालय,अभ्यासिका ई लर्निंग, सीसीटीव्ही संगणक करिता ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यासोबतच जळगाव जामोद मतदार संघात दि.२२ जुलै २०२३ रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे शतिग्रस्त झालेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांकरीता १४ कोटी रुपये,ग्रामीण परिसरातील पर्यटनाचा विकास व्हावा याकरिता भगवान बिरसा मुंडा स्मारकाच्या विकासाकरिता पर्यटन विभागाच्या माध्यमातून ५ कोटी रुपये तर गाव खेड्यातील तांडा वस्तीच्या सुधार योजनेसाठी २ कोटी रुपये तसेच संग्रामपूर व शेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामा करिता सुमारे दहा कोटी रुपये असा तब्बल ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी ग्रामीण परिसरातील विविध विकास कामे करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे.

error: Content is protected !!