india Maharashtra political party देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

शेगांव येथुन अयोध्येसाठी १४ फेब्रुवारी ला धावणार आस्था स्पेशल ट्रेन.

Spread the love

राम लल्लांच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे विनोद वाघ यांचे आवाहन.

देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :

राम मंदिर दर्शन हा प्रत्येकाच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय बनला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतूनसर्वच देशवासीयांना या सोहळ्यात सहभागी करुन घेतलं जात आहे.देशभरातील भाविकांना अयोध्येत दर्शनासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. २२ जानेवारीनंतर भक्तांना प्रभुरामलल्ला चे दर्शन व्हावे यासाठी ५ फेब्रुवारी पासून आस्था रेल्वे अयोध्येसाठी धावत आहे.बुलढाणा जिल्ह्यातील रामभक्त साठी १४ फेब्रुवारी रोजी शेगांव रेल्वे स्थानकावरून ही रेल्वे धावणार आहे.

आस्था स्पेशल ट्रेनची जिल्ह्याची जबाबदारी भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांच्याकडे देण्यात आली आहे.या रेल्वेला आ.डॉ. संजय कुटे हिरवी झेंडी दाखवणार आहेत. आ.आकाश फुंडकर,आ.श्वेता महाले, भाजप प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती व जिल्हयातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

आता जगभरातून सर्व धर्मिय भाविकांना अयोध्येला यावे वाटत आहे.अयोध्येतील प्रभु श्रीरामाचे दर्शन करून मंदीराची भव्यता पाहावी वाटत आहे.त्यामुळे या भक्तांची रेल्वेने स्लिपर कोचमध्ये जाण्यायेण्याची चहा,नाष्टा, जेवण, राहण्याची व व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात आले असल्याची माहिती विनोद वाघ यांनी दिली आहे.

error: Content is protected !!