political party देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

अखेर सिंदखेडराजा ते शेगांव भक्ती मार्गाच्या रस्त्याला मान्यता : डॉ शशिकांत खेडेकर

Spread the love

देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :

गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पासून मातृतीर्थ  सिंदखेडराजा ते संत नगरी शेगाव भक्तिमार्ग १०९ किलोमीटरच्या रस्त्याला अंतिम मान्यता राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली आहे सदर मार्ग लवकरात लवकर मंजूर व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता  मातृ तीर्थ ते संत नगरी भाविकांसाठी मैलाचा दगड असणार असल्याची माहिती माजी आ. डॉ.शशिकांत खेडेकर यांनी दिली आहे.

शेगांव हे विदर्भातील एक पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. शेगांव ला कापसाची मोठी बाजारपेठही आहे.या परिसरात कापूस जिनिंग आणि प्रेसिंगचे मोठे जाळे असून मिलमधील उत्पादन राज्यातील अन्य ठिकाणी कापड निर्मितीसाठी मालगाड्यांद्वारे नेले जाते.श्री संत गजानन महाराजांच्या वास्तव्यामुळे शेगांव हे तीर्थक्षेत्र बनले आहे.गजानन महाराज हे अध्यात्मिक संत होते. माघ सप्तमी शके १८०० दि.२३ फेब्रुवारी १८७८ रोजी श्री गजानन महाराज प्रथम शेगांव येथे प्रकट झाले. हा दिवस ‘श्री प्रकट दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांनी दि.०८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवन समाधी घेतली. श्री राम जन्मोत्सव आणि श्री पुण्यतिथी इत्यादी उत्सवासह ३३ वार्षिक उत्सव गजानन महाराज संस्थान मार्फत साजरे केले जातात.येथील मंदिरात दररोज मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन घेतात आणि संस्थानतर्फे साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक उत्सवासाठी लाखो भाविक शेगावला भेट देतात. तसेच सिंदखेड राजा हे माँसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे.जिजाऊ सृष्टी हे जिजाईंचे स्मारक असून ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पळसखेड येथील इंटरचेन्ज पासून जवळ आहे.

महाराष्ट्राचे श्रद्धास्थान माँ. जिजाऊ यांचे जन्मस्थान व श्री गजानन महाराज,शेगांव या धार्मिक केंद्राशी जोडणारा, सिंदखेडराजा ते शेगांव हा नवीन प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग बांधणे करिता या महामार्गाची आखणी अंतिम करण्यासाठी शासनाने  निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत शासन मान्यतेसाठी सादर केलेल्या उपरोक्त आखणीस अंतिम आखणी म्हणून शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर द्रुतगती महामार्गाचा विकास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास शासन मान्यता दिली आहे.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!