देऊळगाव राजा येथे क्रिकेट सामन्यांचे उदघाटन
देऊळगाव राजा|समर्थ भारत मराठी:

जनतेच्या सेवेतून आपल्या परिसराचा सर्वतोपरी विकास करण्याचे ध्येय मनाशी बाळगले तर एखादा प्रतिनिधी कशाप्रकारे प्रभावी कार्य करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ.शशिकांत खेडेकर यांचे कार्य होय. ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मतदार संघात जवळपास ४०० कोटी ची विकासकामे त्यानी मतदार संघाच्या विकासासाठी खेचून आणली.यामध्ये रस्ते,वीज,पाणी आधी मूलभूत सुविधा पुरवत असतानाच विविध शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना दिसत आहे. त्यामुळे डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या नेतृत्वात मतदारसंघ विकासाकडे आगेकूच करताना दिसत आहे.त्यांच्या या प्रभावी विकास कार्यामुळे पुढील निवडणुकीत डॉ.खेडेकर यांना कोणतीही अडचण येणार नाही व जनतेचा भरभरून आशीर्वाद मिळेल असे प्रतिपादन डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट सामन्याचे उद्घाटनाप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव यांनी बोलताना केले.
यावेळी माजी आ.डॉ.शशिकांत खेडेकर,माजी आ.तोताराम कायदे,ज्येष्ठ नेते डॉ.रामदास शिंदे, देऊळगांवराजाचे नगराध्यक्ष सतीश तायडे,ज्येष्ठ नेते देविदास ठाकरे, उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे,दीपक बोरकर ,शिवप्रसाद ठाकरे,माजी जिल्हा परिषद सदस्य उषा खेडेकर,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनील चित्ते,गोपाळ व्यास,भाजपचे नेते सुनील कायंदे,विजय देवउपाध्ये,मोरेश्वर मीनासे,नंदन खेडेकर,सलीम पठाण,श्रीनिवास खेडेकर,नितीन आढाव,अभय दीडहाथे, अतिष खराट,राजेश सपाटे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश धुदळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळवा क्रिकेट संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
“राजकीय,सामाजिक व सहकार क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेले जिल्ह्याचे सर्वमान्य नेतृत्व म्हणजे खा.प्रतापराव जाधव. त्यांचे सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन मला नेहमीच लाभत आले त्यामुळे मतदारसंघाच्या विकासात जास्तीत जास्त योगदान देऊ शकलो.यांचे सहकार्य व त्यांचा आशीर्वाद असाच आपल्या पाठीशी यापुढे देखील राहील.”
….डॉ.शशिकांत खेडेकर

जवानाला अभिवादन करून क्रीडा स्पर्धेला सुरुवात :
सिंदखेराजा तालुक्यातील मौजे जागदरी गावचे सुपुत्र सुभेदार स्व. अनंतरावजी गिते यांना दि.२४ डिसेंबर रोजी हरियाणा राज्यातील हिसार येथे कर्तव्यावर असताना विरमरण आले.त्यांच्यावर २६ डिसेंबर रोजी शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले.क्रिकेट सामन्याच्या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी जवानाला अभिवादन करून करण्यात आली.
मतदारसंघ पहिल्यांदाच अनुभवतोय डिजिटल व आधुनिक थरार. :
क्रिकेट खेळाचा मोठा चाहता वर्ग आहे, शिवाय अनेक खेळाडूंमध्ये सुप्त गुण लपलेले असतात. त्या गुणांना वाव मिळवण्यासाठी क्रीडा स्पर्धा आवश्यक असतात. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डिजिटल माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या क्रीडा स्पर्धेत थेट प्रक्षेपण क्रीडाप्रेमी साठी केले असून उत्तम नियोजन या ठिकाणी खेळाडूंसाठी केलेले आहे.याचबरोबर अंपायरला देखील हैदराबाद येथून पाचारण केले आहे त्यामुळे पहिल्यांदाच शहरात भव्य दिव्य नियोजन डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या समर्थकाकडून केले आहे.













