जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

भेसळयुक्त सिमेंटचा पुरवठा; खामगाव च्या विक्रेत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल.

Spread the love

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

खामगाव येथील शेख सलीम या सिमेंट विक्रेत्याने एका नामांकित कंपनीचे भेसळयुक्त व कमी वजनाचे सिमेंट विक्री केल्याची तक्रार तालुक्यातील सूनगाव येथील राजेंद्र बैस यांनी जळगाव जामोद पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दि.२५ डिसेंबरला विक्रेत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्रसिंग लोकेंद्रसिंग बैस (२५) रा. सुनगाव यांचे घराचे बांधकाम सुरु असून त्यांनी खामगाव येथून शेख सलीम शेख जलील (४५) रा. ताजनगर याच्यामार्फत एका नामांकित कंपनीचे ३०० बॅग सिमेंट घेतले. हे सिमेंट वापरुन त्यानी घराचे काही बांधकाम केले असता सिमेंट भेसळयुक्त असल्याचे त्याच्या लक्षात आले. १० ते १२ दिवस बांधकाम झालेल्या मध्ये खिळे सहज जात आहेत तसेच भिती पोकळ झाल्या आहेत.सिमेंटच्या पॅकिंग ही वरील पॅकिंग ही पिवळ्या धाग्याने व खालील पांढऱ्या धाग्याने केलेली आहे.याबाबत त्यांना संशय आला असता त्यांनी सिमेंट थैलीचे मोजमाप केले असता त्यांना २ते ८ किलो मोजमापात कमी आढळले. राजेंद्र बैस याने सिमेंट पुरवठादार शेख सलीम याला सांगितले असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला.सिमेंट विक्रेत्याने नामांकित कंपनीच्या सिमेंटचे पॅकिंग स्वतः करून त्यामध्ये भेसळयुक्त सिमेंट भरले आहे असा त्यांना संशय आला त्यामुळे त्यांनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत दोडके, पो.कॉ.सचिन राजपूत यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.बैस यांच्या तक्रारी वरुन पोलिसांनी शेख सलीम शेख जलील याच्याविरुध्द कलम ४२० भा.द.वी.नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दोडके हे करीत आहेत.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!