Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगाव जामोद चे नंदकिशोर उमाळे सायक्लोथॉन मध्ये सहभागी.

Spread the love

मुबंईत संपन्न झाली १००किमी सायक्लोथाँन स्पर्धा.

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी : 

मुंबई येथे १७ डिसेंबर रोजी जिओ मुंबई सायक्लोथाँन या १०० किमी अंतराच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन जळगाव जामोदचे सुपुत्र नंदकिशोर उमाळे यांनी ती अवघ्या 5 तासात पूर्ण केली.

बीकेसी ग्राउंड मुंबई येथून १७ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता या स्पर्धेची सुरुवात झाली.यामध्ये महाराष्ट्रातून निवडक स्पर्धकांनी भाग घेतला होता. जळगाव जामोद येथील ज्ञानेश्वर नागरी पत संस्थेचे व्यवस्थापक नंदकिशोर उमाळे यांनी नोंदणी केली होती. स्पर्थेसाठी १६ डिसेंबरला ते आपल्या सायकलसह मुंबईत पोचले.१७ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता बीकेसी ग्राउंड वरून त्यांनी या स्पर्धेत सायकल रायडींग केले.बांद्रा, वरळी सी फेस, दादर, माहीम मार्गे त्यांनी ही महा मॅरेथॉन अवघ्या पाच तासांमध्ये शंभर किमी अंतर कापत यशस्वीरित्या पूर्ण केली.

“मुंबईमध्ये शंभर किमी सायकल रायडींग करण्याचा माझा अनुभव अविस्मरणीय होता.वरळी सी लिंक वरून सायकल चालवताना वेगळा थरार होता.गेल्या चार-पाच वर्षापासून सायकल रायडींग चा छंद मी जोपासत आहे.दररोज सातपुड्याच्या घाटामध्ये सायकलिंग केल्याने मला प्रचंड आत्मविश्वास लाभला.त्यामुळे या स्पर्धेत भाग घ्यायचा हे मी ठरवले होते.” 

नंदकिशोर उमाळे,व्यवस्थापक ज्ञानेश्वर नागरी सह. पत संस्था. जळगांव जा.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!
ग्रुप जॉईन करा