देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

दगडवाडी गावाची आदर्श गाव संकल्प प्रकल्प राज्यस्तरीय टीमकडून पाहणी.

Spread the love

देऊळगाव राजा|समर्थ भारत मराठी : 

बुलढाणा जिल्ह्यातील दगडवाडी गावाने आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेमध्ये गाव समाविष्ट करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशीने आदर्श गाव कार्यालय, पुणे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार राज्यस्तरीय टीमने दगडवाडी गावाला दि.१७ रोजी भेट देऊन संपूर्ण गावची व शिवाराची पाहणी केली.

दरम्यान दगडवाडी गावांमध्ये दत्त मंदिरावर ग्रामसभा घेण्यात आली.यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकला गजानन घुगे होत्या तर आदर्श गावचे कृषी उपसंचालक रविकांत गौतमी प्रमुख उपस्थिती होते.

योजनेचे कार्याध्यक्ष पद्मभूषण पोपटराव पवार हे आहेत.हिवरेबाजार सारखा दगडवाडीचा विकास करण्यासाठी गावची निवड होणे आवश्यक आहे.गावांमध्ये पाणलोट क्षेत्राची व गाव विकासाची सर्व कामे करण्यासाठी ग्रामस्थ यामध्ये सहभागी होणार आहेत.यासाठी प्रकल्प कार्यान्वय  यंत्रणा म्हणून जिजामाता शिक्षण क्रीडा व बहुउद्देशीय संस्था, दगडवाडी यांच्या अंतर्गत कामे करून गावचा विकास करू असे संस्थेचे अध्यक्ष गजानन कारभारी जायभाये यांनी सांगितले.

आलेल्या राज्यस्तरीय पथकाने ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांची परीक्षा घेतली. सप्तसुत्रे आधारावर  हा कार्यक्रम असल्यामुळे सराईबंदी,कुऱ्हाड बंदी,नसबंदी,नशा बंदी,बोरवेल बंदी,लोटा बंदी लोकसहभाग सप्तसुत्रीचे पालक आम्ही काटेकोरपणे करू व गावचा विकास करू असे गावकऱ्यांनी सांगितले. प्रस्तावाची संपूर्ण पडताळणी करण्यात आली.समितीने याबाबत समाधान व्यक्त केले. संपूर्ण गावचा, शिवाराचा प्रकल्प आराखडा करून त्याचप्रमाणे पुढे कामे करावी व गावातील सर्व घटकांचा यामध्ये विकास होणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाला गावच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,ग्रामस्थ व पत्रकार सुरज गुप्ता यावेळी उपस्थित होते.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!