Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

क्रांतीसुर्य महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त सन्मान शोभायात्रा.

Spread the love

जळगाव जामोद|समर्थ भारत मराठी :

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले पुण्यतिथी उत्सव समितीच्या वतीने सन्मान शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.दि.२८ रोजी सकाळी नऊ वाजता बाजार समितीतील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला राजकिय पदाधिकारी व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सायंकाळी ठीक सहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. माळी खेल,महात्मा फुले चौक,चावडी,दुर्गा चौक,जुना भाजी बाजार असा शोभा यात्रेचा मार्ग होता. सदर शोभायात्रेमध्ये वारकरी संप्रदायाच्या मदतीने टाळकरांनी आपले अभंग सादर केले.अश्वारूढ रथामध्ये महात्मा फुले यांची आकर्षक मूर्ती ठेवण्यात आली होती.शोभा यात्रेला सांप्रदायिक आणि धार्मिक श्रद्धेची जोड असल्यामुळे काढण्यात आलेल्या शोभायात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.  तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर विचारधारेची सर्व मंडळी बहुसंख्येने शोभायात्रेत उपस्थित होती. माळी खेल,गोबजी खेल ,रामनगर ,कृष्णा नगर ,खेर्डावेस,सुनगाव वेस,प्रेम नगर, गोविंदपुरा येथील समाजबांधवांच्या विशेष सहकार्याने ही शोभायात्रा काढण्यात आली.

error: Content is protected !!