Education जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा.

Spread the love

जळगांव जामोद,दि.२३(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय,खेर्डा येथे राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.संतोष धर्माळ,सहा. शिक्षक, प्रमुख अतिथी म्हणून गजानन सोनटक्के, प्रा. विनोद धर्माळ, प्रा.कु एन.आर.शहा उपस्थित होत्या. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन,प्रतिमा पूजन व हार अर्पण करण्यात आला यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात  प्रा.विनोद धर्माळ यांनी  राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापने मागील उद्देश सांगितला.महाविद्यालयातील कु.आस्था गावंडे,कु.दिपाली  उमरकर,कु.प्रांजली दामोदर,कार्तिक गोंगे व  विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.संतोष धर्माळ यांनी विविध प्रकारचे दाखले देऊन विद्यार्थ्यांना आपल्या अंगी सेवाभाव,सचोटी, आत्मनिर्भरता अंगीकारायला पाहिजे असे प्रतिपादन केले. तर प्रमुख अतिथी पत्रकार गजानन  सोनटक्के यांनी विद्यार्थी जीवनामध्ये अभ्यासाबरोबरच  समाजसेवा व राष्ट्रसेवा अंगीकारावी असे प्रतिपादन केले.प्रमुख अतिथी कु. शहा  यांनीही मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा.संतोष जाधव कार्यक्रमाधिकारी स्वच्छतेचे महत्व विशद करत संत गाडगे महाराजांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु गौरी राजुरकर व कु. वैष्णवी वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतन हातेकर याने केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!